...

21 views

तुझे स्वप्न..
तुझे स्वप्न..

मोकळ्या केसांना तुझ्या उडवणारा तो वारा व्हायचं आहे मला..
मला पाहून तुझ्या डोळ्यांत दिसणार ते प्रेम व्हायचं आहे मला..

तुझे स्वप्न मनात घेऊन खूप वेळा मी जगलो आहे..
एकदा तुझ्या स्वप्नात येऊन तुझ्यासोबत जगायचं आहे..

अलगद आलेल्या वाऱ्याची सर तुझीच चाहूल देऊन जाते..
तू नसलीस तरी तू असल्याचा भास होऊन जाते..

तुझ्या नासण्याने तुझं 'असणं" जपायचं आहे मला..
तुझ्या डोळ्यांमधलं काजळ होऊन तुझं जग बघायचं आहे मला..

तुझ्या जवळ सुगंधाने दरवळनारं ते अत्तर व्हायचंय मला..
नाकाराच्या आभाळात माझी झालेली पाहायचंय तुला..

-©सागर_एक अथांग मन

#ekathangmann #प्रेम #मन #कविता #writcowriter