...

4 views

श्री शिवाजी महाविद्यालय प्रवास
दहावीत असताना बाहेरून नजर फिरायची ,
अन् शिवाजी महाविद्यायांमध्ये प्रवेश घेण्याची चाहूल लागायची ,
अखेर तो दिवस आला अन् ,
महाविद्यालयात प्रवेश घेतला ,
प्रवेश करताच मान होते ताठ ,
कारण नावातच आहे महाराष्ट्राची शान ,
अस आपल शिवाजी महाविद्यालय ...💫

रोज नतमस्तक होऊन करतो आम्ही प्रवेश ,
कारण स्वर्गाहून ही सुंदर अस ,
हे श्री शिवाजी महाविद्यालय ....💫
पहिलं सेमीस्टर online झालं ,
शिक्षकांची ओळखही झाली online,
online मूळ आला सर्वांचाच जास्त स्कोर,
अन् झाले सर्वजण A grade मध्ये पास
दुसर सेमीस्टर झालं Mcq अन् ,
1 year पडलं पार ,
अशाच गोड ,तिखट ,आठवणींनी ,
2 year पडल पार ,

शिक्षक अन् विद्यार्थ्याच्या ,
नात्याचा खरा अर्थ इथच कळला ,
ज्या मुलीला मिळाली नाही ,
आई वडिलांचं सुख कधीच नाही भेटलं ,
तिलाही शिक्षकांकडून मिळाली माया अन् छाया ,

स्वाभाव जुळले , भावणाही जुळल्या ,
काहीशी मैत्री झाली ,काही जणांची ताई झाले ,
chemistry जास्त काही कळत नव्हत ,
तरीही त्याची साथ कधी सोडली नाही ,
कारण त्याच्याशिवाय दुसरीकडे स्कोप नाही ,
सर्वांशी ओळख झाली अन् सर्वच कधी आपले होऊन गेले कळलच नाही ,💫

स्वभाव आहे सर्वांचा गोड ,
मनात आहे आपुलकी अन् माया ,
असे अनमोल ज्ञान देणारे
शिक्षक आम्हाला लाभले ,
कधी विसरणार नाही तुमचे उपकार ,
तुमची ती मया अन् छाया .....💫

तुमची विद्यार्थिनी ,
राजनंदिनी लोमटे ✨