...

9 views

✍️ नेहमी वाटते मला असे........
नेहमी वाटते मला असे,
एकांत क्षणी कधी तरी असं वाटतं
कुणीतरी आपलं असावं,
सुखाच्या क्षणी साथ आणी
दुःखाच्या क्षणी तिनं मला हसवावं..........

नेहमी वाटते मला असे,
माझ्या जीवनातील नाजूक मैत्रीच्या
कळीने फुलाचा जन्म घ्यावा,
बहरलेल्या या फुलाचा सुगंध
सतत माझ्या आयुष्यात दरवळत रहावा...

नेहमी वाटते मला असे,
अजून होतो तुझ्या त्या
आठवणींचाच आभास,
होत नाही आजही विश्वास
खरंच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास.....

नेहमी वाटते मला असे,
उधाणलेल्या या मनाला
असतेय फक्त तुझीच वाट,
उसळूनी या मनात भरते
स्वप्न सागराची मोठी लाट............

नेहमी वाटते मला असे,
अनमोल माझ्या या जीवनात
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला माझ्या अखेरपर्यंत
हात तुझा हाती हवा आहे..........

नेहमी वाटते मला असे,
हरवलेलं होत जे स्वप्न माझे
ते तुझ्या रूपाने परत मिळाले,
रुसले होते जे प्रेम माझे
ते तुझ्या मैत्रीने परत आले..........

नेहमी वाटते मला असे,
तु म्हणजे तूच आहेस
मी म्हणजे मी तुझाच आहे,
जन्मभर राहो मैत्री आपुली कारण
तुझ्याशिवाय मला काही जमणार नाही......
संकलन -प्रविण मोरे

© " एक माझी रचना "