...

8 views

बाहुली
आई बाबांची एक छोटीशी बाहुली
खूप लाड कौतुक करून ती वाढवली
हवे ते हट्ट बाबांनी पुरवले
आई मागे राहील कशी फुला प्रमाणे सांभाळले
सुखाची काही कमी नव्हती
आनंदाची ही रोज दसरा दिवाळी
प्रत्येक दिस सणा सारखा भासे
तिघांच्या राज्यात खूप मज्जा असे
एके दिवशी त्यांच्या सुखाला नजर लागली दृष्टाची
गोड बोलून सहानभूती मिळवली सगळ्यांची
बाहुली संगे संसार करेन
आयुष्यभर सुखात नांदेल
मनामध्ये दडलेले बाहेर आले सारे
पैशांच्या हव्यासापायी होऊ नको ते झाले
बाहुली लागली रडू जोर जोरात आक्रोश करू
आई बाबांनी ऐकले आणि परी कथेतल्या राजकुमारी प्रमाणे सोडवून तिला आणले
पुन्हा सुरु झाला तिघांचा भातुकलीचा खेळ
जिथे कुठेच नव्हती दुःखाची वेळ
सुखी आयुष्यात तीघेही रमले
बाहुली संगे आनंदात दंगले...