...

6 views

माझे बाबा
जन्म होता माझा
बाप ही जन्मला ;
थोडे मोठे होता
बंध उमगला ।
चढविली ज्यानी
पहीली पायरी ;
आत्म विश्वासाची
ती नोंद गहिरी ।
मित्रांचा मित्र तो
मार्मिक हळवा ;
हव्याश्या प्रेमाचा
श्रावण हिरवा ।
अडचणीं च्या वेळी
त्याचाच आधार ;
जन्माचा आहे तो
चक्र मूलाधार ।
मनात वसतो
त्याचा थाट-बाट ;
तोचि अविरत
हृदय सम्राट ।
कर्तूत्वाचा माझ्या
भाग्य शिरोमणि ;
जिवन दात्याचा
मी सदैव ॠणी ।

✒️ कवी ,
🇮🇳 विजय दागमवार
© 💫अक्षरांच्या ओळी