...

5 views

काहीच उरलेत क्षण जगण्याचे, सहज सरतील तेही ...
मागणे हि लाजवे, काहीसे आल्हादुनी ...

साद हि ना लाभते, साजनी का लाजुनी ...



खळाळणाऱ्या सागराची, तु अनाहुत नांदी...

फुलवेलींनी मोहरलेली, तु वहिवाट सुगंधी...



तुझ्यात सामावलेला माझा, श्वास ही होतो बंदी...

स्वर्ग ही तुझ्याच असण्याने, असेल माझ्या शिबंदी...



काहीच उरलेत क्षण जगण्याचे, सहज सरतील तेही ...

ओठांवर ना खुलले हसु तर, हवेत विरतील तेही ...



आठवणींची बाजारघटका, विकल्या जातात आठवणी...

पाठी फिरता पुसल्या जातील, आर्त मनीच्या साठवणी...



घायाळ होईन मी तुकड्यांनी, चंद्रकोरीसारखा...

स्तब्ध होईन वेदनांनी, स्वप्नांना मी पारखा...
© SURYAKANT_R.J.