...

4 views

विजयादशमी
विजयादशमी ......

प्रथमेस शैलपुत्री, द्वितीयेस ब्रम्हचारिणी माता नवदुर्गा विराजतात घटस्थापनेच्या क्षणी.....

तृतीयेस चंद्रघंटा, चतुर्थीस कूष्मांडा मातेस आलंकार सारे श्रुंगारुणी सुरु होते ही आराधना.....

पंचमीस स्कंदमाता, षष्ठीस कात्यायनी शौर्य-करुणेची, संगोपनाची शोभिनी.......

सप्तमीस कालरात्रि, अष्टमीस महागौरी काळाचीही साक्षी, ज्ञान- शुध्दता प्रदायनी......

नवमीस सिद्धिदात्री करे सर्वांची इच्छापुर्ती या नवरात्रीच्या समुहातुन नवदुर्गांची महाआरती.....

क्षण हा मंगलमय साडेतीन मुहूर्तांपैकी एक विजयदशमी नाव या सणाचे दसरा हो म्हणतात अनेक ......

राग-द्वेष, लोभ मत्सर याचे विसर्जन करुनी निर्मळ - तेजस्वी अशा विचारांनी करुया साजरी ही विजयादशमी

स्त्री वरील अन्याय-अत्याचारांचा नाश करुनी स्त्रीशक्तीचा आदर करुनी करुया प्रत्येक स्त्रीला तेजस्वीनी.......

विवेक-बुध्दी, धाडस- निडरता हे गुण अंगीकारुनी स्त्रीशक्तीचे अस्तित्व झळकवू प्रत्येक मनी.......