...

13 views

निरोप......
अखेरचा तुझ्यामाझ्या काळजाचा एक ठोका
सगळी कडे निशब्द शांतता आणि काळोखाचा विळखा
हुरहूर तुलाही हुरहूर मलाही
भीती मनामध्ये साथ सुटण्याची
एकमेकांशिवाय पुढचा प्रवास करण्याची
पाऊल पुढे टाकण्यास मन हेलावले
आक्रोश मनाचा कोणीही नाही जाणले
क्रूर नियतीने पिछा सोडला नाही
जगण्यासही आता अर्थ काही उरला नाही
हातातील हात सुटले श्वासातील श्वास संपले
वेळ होती निरोपाची दोघींच्या नवीन प्रवासाची
कितीही ठरवलं तरी विसरणार नाही तुला
लवकरच येईन आई तुझ्या भेटीला ...