...

3 views

नवं रंगाची पहाट
तुम्हाला जाऊन सावित्रीमाई आज दिडसे ते पावनेदोनसे वर्ष होतं आहेत.त्या काळी रुढीवादी पुरूषीव्यवस्थेने स्त्रियांचे सारेच अधिकार नाकारले होते.त्यांच्या हसण्यावर,बोलण्यावर,उठण्या बसण्यावर एवढेच नाही तर त्यांच्या विचार करण्यावरही बंदी घातली होती.स्त्री केवळ भोग्य वस्तू होती,तिचे माणूसपणच पुरूषीव्यवस्थेने नाकारले होते.
या अशा अनेक अदृश्य बेड्या स्त्रीयांच्या पायात होत्या त्या सर्व बेड्यांना माई तू तोडलस..
अन बघता बघता तिने आकाशाला गवसनी घातली आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे.
पण तरीही माई तिला मंदिर प्रवेश नाकारलो जातो,त्यासाठी तिला रस्त्यावर येऊन आंदोलने करावे लागतात प्रश्न मंदिरात जाण्याचा नाहीच आहे प्रश्न समानतेचा आहे, ती माणूस असण्याचा आहे.
अन त्याची जाणिव माई तू करुन दिलीस पुन्हा एकदा सत्याला पुर्नजिवीत माई तू केलसं ..
माई आमच्या आयुष्यात नवरंगाची उधळण करून आमचा आयुष्य अधिक समृद्ध आणि सुसह्य केलंस,ही पहाट तुझ्याच मुळे माई... नवरात्री महोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
प्रा.जया शिंदे