...

1 views

मामा ....🌍🤍.. आनंद पाटील ...
पाटील कुळालां वंशाचा दिवा झाला ,
जन्म होताच सर्वत्र आनंद झाला,
बालकृष्णनासारखा नटखटपणा वाढतच गेला ,
सर्वांचा आवडता होऊ लागला ....❤️

लहानपणी पितृछाया हरवली ,
जबाबदारी अंगावर पडली ,
वया प्रमाणे चिंता दुप्पट वाढतच गेली ....

वारकरी संप्रदायात घेतला प्रवेश ,
आवाज होता मधुर म्हणून ,भजनात झाला प्रमुख ,
हरिनाम घेऊन जीवनाची ,
वाट पुढे चालू लागली ...

बहिणीचा संसार बसवण्यात
तरुणपण गेलं ,
त्यांच्या सुखासाठी आयुष्य पणाला लावलं...

ना कुणाचा आधार ,
ना कुणाचा दिलासा ,
कोणाची अपेक्षा नाही ,
स्वबळावर स्वावलंबी झाला ....

मनातली भावना कधी ना सांगे ,
कुणा कधी दुखवत नाही ,
परिस्थिती हसत स्वीकारतो माझा मामा ....

माणूस बघताच पारखतो,
भविष्यातील तर्क हातात खरे ,
कृष्णसारख रूप तुझ ,
रमासारखा आईच भक्त
असा देवस्वरुप माझा मामा ....

निर्व्यसनी , चतुर ,बुद्धिमान
सर्वगुणसंपन्न असा माझा मामा,
स्वभाव आहे साखरे सारखं गोड ,
जिथं जातो तिथं आनंद ....

बापच आहे माझा तू ,
लहानच मोठं केलं ,
संस्कार , सुशिक्षित केलं ,
आयुष्याची दिशा दाखवली ....

जिवात जीव आहे तोपर्यंत ,
नाही विसरणार तुझे उपकार ,
माझ जग माझा मामा .....

तुझी भाच्ची ,
राजनंदिनी लोमटे ...