...

18 views

ऋतु उत्सव = मासिक पाळीचा
कविता : जन्म उत्सव मासिक पाळीचा
======================
होय,मासिक पाळी हा खुप मोठा उत्सव आहे
स्त्री यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे
Periods म्हणजे उजळत्या दिव्याची वात होय
मसिक पाळी म्हणजे स्त्री आणि पुरूष सबंधातिल
एक निरागस उमगलेल कोमल फूल असत.

मसिक पाळी हा कलंक नसून एक वरदान आहे
स्त्रीयांच्या शरीरात गर्भात वसलेल पवित्र स्थान आहे.

काही समाज कंठक लोक मासिक पाळीचा विरोध करतात
कर्मकांठ,रूढ़ी,परंपरा यात समाजाला गुरफटून ओढतात
स्त्री च्या गर्भातुनच 'आई'या शब्दाचा जन्म होतो
मग हा समाज मासिक पाळीला अंधश्रद्धा सोबत का जोडतो.

दूर वर अंतरावर आकाशात चंद्राच चंद्रग्रहण होत असत
मासिक पाळीचा आणि चंद्रग्रहणाचा संबंध कसा बरे येतो?

मासिक पाळी आली कळताच मनात विचारांच युद्ध सुरु होत
अचानक शरीरातील शुद्ध रक्क्त अशुद्ध वाटायला लागत
शिवा-शिव, इकडे नको तिकडे नको जाऊ पासून वंचित करतो
सुतक,अमावस्या,काळादिवस या मधे तिला घट्ट बांधून टाकतो.

मंदिर,मस्जिद,पुजा-पाठ,लग्न,कार्यक्रमला जाने यावरती कठोर लक्ष्मणरेखा ओढतो,समाज तिला चार भिंतित्त कोडुंन ठेवतो.

लैंगिक शोषण करताना मनमुराद तिचा छळ करतो
मग मासिक पाळीला किळसवानी नजरेने का पाहतो
हे देवा हा सुशिक्षित समाज असुशिक्षित सारखा का वागतो
सर्व जानुन सुध्दा समाज कंठकाच्या बळी पडतो.

तिच्या मनाच्या वेदना फ़क्त तिलाच कळतात
ति खचून जाते एकट्या मनाला खात जाते
मासिक पाळी वरदान की शाप असे वाटायला लगते
तिच्या डोळ्यातिल पानी कोणाला दिसत नाही
तिच्या गर्भातील त्रास ति कोणाला सांगू शकत नाही.

अहो, रक्त अशुद्ध असत तर प्रभु श्रीराम, शिवाजी महाराज,
बाबासाहेब,गौतम बुद्ध हे महामानव जन्माला आलेच नसते.

चला तर मग आपन सर्व मिळून अंधश्रद्धाची साखळी तोड़ू या अशा समाज कंठकाना तोंडावर उत्तर देऊ या
सर्व महिलांना न्याय मिळून देऊ या
मासिक पाळी कलंक नसून एक वरदान आहे हा संदेश पसरु या.

लेखक :- सूरज तायडे
------------------------