...

12 views

💫प्रवास💫
काळोखाच्या विश्वामध्ये,आहे जन्म हा सूर्याचा ।
होई सुरू हा प्रवास, अंधारात प्रकाशाचा ॥
अंधकारात असते, आसं प्रकाशाची ।
नको होऊ रे उदासी, कर निर्धार मनाशी ॥

मार्ग खडतर जाई, अंधकाराच्या सोबती ।
प्रवास सुलभ हा होई, हाती प्रकाशाच्या ज्योती ॥
प्रकाश-अंधकार,एक खेळ लपंडाव ।
एक नाणे-दोनं बाजू, घे समजूनी डाव ॥

मगं उगम ज्ञानाचा, ज्ञान प्रकाश बनून ।
अज्ञानाच्या अंधारात, दिवा ज्ञानाचा तेवून ॥
लागे दिवा तो हाताशी, दृष्टी मिळे नयनासी ।
होई प्रकाश सोबती, वाट चाले हां प्रवासी॥

हा प्रकाश-अंधार, याची ओळख प्रवास ।
प्रवासी जीवनात, जीवनओळख प्रवास...
प्रवासी जीवनात, जीवनओळख प्रवास ॥॥
.....एक प्रवासी✍️
© Gautam