...

14 views

ती...
मनासोबत नजर ही भिरभिरली
जेव्हा तिच्या येण्याची चाहूल लागली

काळेभोर केस तिचे सावरत...
जेव्हा तिने एकेक पाऊल पुढे टाकले
वेली झाल्या स्तब्ध झाडावरही शहारे उमटले
तिचे मोहक सौंदर्यही साधेपणाणे झळकले
अलंकार आभूषणेही सौंदर्यात जणू भर घाले

भिरभिरत मोहक चालणे तिचे असे
कोणासही आपल्या वश करील जसे
निखळ हास्य तिच्या गालावर जेव्हा दिसे
कोणीही तिच्या बंधनातून मुक्त नसे

रहावलं नाही मग वेड्या निसर्गाला
निरोप दिला बरस असा त्याने पावसाला
थंडगार सुखद पाऊस ही असा बरसला
त्या सुखद सरींनी भिजवून चिंब केले तिला

पावसाचा एक थेंब तिच्या हातावर ओघळला
तिचा हात सोडवेना त्या थेंबाला
तिच्या नयनी भावना भरून आलेल्या
काय नाव द्यावे तिच्या निरागसतेला

चिंब भिजत तिने आपल्या पापण्याही मिटल्या
पावसाला झेलण्यासाठी ओंजळ केली हाताला
निसर्ग ही तिच्या सुंदर रूपाने बहरला
तिच्या अवखळतेला डोळयात साठवू लागला

ती तिच्या भाळावर जेव्हा चंद्रकोर कोरी
वाटे एका राजाची ती राजकुमारी
दुनिया विसरलो तिच्या नयनात पाहताना
तिच्या नयनात विसावली होती भावुकता

मी माझ्याच तंद्रीत आपले
शब्दामध्ये शब्द गुंफले
समोर येऊन ती कधी उभी...
माझे मलाही नाही कळले

तिने बोलण्यासाठी जेव्हा ओठ उघडले
मी राहिलो नुसता ततपप करत
तिच्यात शब्द गुंफत होतो की शब्दात तिला
माझे मलाच कोडे पडले

माझी उडालेली तारांबळ तिने पाहून
नकळत तिच्या गालावर आले हास्य उमटून
पाहिले तिने जेव्हा खुदकन असे हसून
वातावरण ही आनंदाने गेले फुलून
न संपावे असे हे अविस्मरणीय क्षण...

-अवि


© All Rights Reserved