...

6 views

मी मात्र मोकळा झालो
चिंता साऱ्या आसवांच्या उशाला देऊन,
मी मात्र मोकळा झालो, दुःख पचवून
आता काही येत नाहीत, त्या दुःखाचे उमाळे,
मी थोपवून धरले, त्याला जरासे बळेबळे
गहिवर दाटलेला संपला, मोठ्ठा आवंढा गिळून
मी मात्र मोकळा झालो, दुःख पचवून
प्रत्येकाचे दुःख वेगळे, त्याच्या वेगवेगळ्या चिंता,
जळणाऱ्या काळजाने, वरखाली होतो छातीचा भाता
मी मात्र मुक्त झालो, आनंदाची हवा श्वासामध्ये भरून
मी मात्र मोकळा झालो, दुःख पचवून
_पहल