...

10 views

लिहिणे अगत्य आहे...
#PoetryChallenge

वास्तव थोडे पाहू म्हणता
साऱ्यांनाच खटकते आहे
कॉफीचा कप मज म्हणतो
आता लिहिणे अगत्य आहे..धृ

उसंत घ्यावी जरा निवांत
अन स्वच्छंद फिरुन यावे
शांत मार्गीचा भव एकांत
पुन: जाणून घेण्यास जावे
पडत्या पाचोळ्यात दडले
गूढ कोड्याचे उत्तर आहे...१
कॉफीचा..

कुठे तळ्याचे काठ शोधून
लाटांमध्ये जीवन शोधावे
कुठे झऱ्याची घळ पाहून
निसर्ग कुशीत लीन व्हावे
संथ जलाच्या मंद ध्वनीत
शिव तत्वाचे चैतन्य वाहे...२
कॉफीचा..

ऊन सावली वादळ वारे
सारे झेलुनी पुढे चालावे
जरी सर्वस्व उध्वस्त झाले
तरी ध्येयाच्या पथी राहावे
राखेतून झेप नवी घेण्या
अग्निपंख खुणावत आहे...३
कॉफीचा..

© ईशान्य..
© ishanya