...

2 views

आपलीच माणसं
कुणाला आपला कंटाळा येईल
इतकं जवळ जाऊ नये,
चांगुलपणाचे ओझे वाटेल
इतके चांगले वागू नये...!!

कुणाला गरज नसेल आपली
तिथे रेंगाळत राहू नये...

नशीबाने जुळलेली नाती
जपावी पण तोडू नये,
गोड बोलणे गोड वागणे
कुणास अवघङ वाटू नये...!!!

जवळपणाचे बंधन होईल
इतके जवळचे होऊच नये ,
सहजच विसरून जावे सारे
सल मनात जपू नये...!!

नकोसे होऊ आपण
इतके आयुष्य जगूच नये....

हवे हवेसे असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे,
आपले नाव...