...

6 views

घे सांभाळून ....!
जेव्हा तुझ्या डोळयातलं प्रेम
शब्दात उतरत नाही
तेव्हा नकळत मी केलेला असतो
अक्षम्य गुन्हा ... तुझं मन दुखावण्याचा !
मला माझ्या समर्थनाचे
सारे शब्द टोकडे पडतात
अन् तू अजूनच खोल दुखावली जातेस ....
तेव्हा माझ्या शाब्दीक दारिद्रयतेची
अक्षरक्षः कीव येते मला.... !
एकांतात मग शोधु पाहतो कारण
आणि पोहचतो तुझ्या हृदयाच्या तळाशी
तिथं दिसतं केवळ प्रेम आणि प्रेमच
फक्त माझ्यासाठी... !
नेहमी प्रमाणेच तू सावरतेस
स्वतःहून . अॅटो मोड मध्ये..
तेव्हा मला माझी तीच 'तू ' मिळतेस परत
आपल्या मधूर हास्याने मधूर शब्दाने
माझं जग सुंदर करणारी... !
पण कधी मलाही संधी दे
तुला मनवण्याची... !
तुझ्या डोळयांत पाहून
तुला एकच सांगावं वाटतं
माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.. ..
अगदी जीवापाड.... घे सांभाळून... !

# शिव पंडित


© All Rights Reserved