...

8 views

आठवणीतला क्षण ..... 👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨
तुझ्या आठवणीतला क्षण
माझ्यासाठी खास होता,
कारण हात तुझा माझ्या हाती होता.....

आस तुझी ध्यास तुझा
सदैव तुझ्या पाठी होता,
कारण हात तुझा माझ्या हाती होता

आठवणींच्या अश्रुंणाही
तुझ्या मदतीची साथ होती,
कारण हात तुझा माझ्या हाती होता.......

तो रुसलेला चेहरा पाहताना
माझ्या डोळ्यांत अश्रु होता,
कारण हात तुझा माझ्या हाती होता..

आठवणीतला नाजूक क्षण माझ्यासाठी
माझ्यावरच प्रेमाची साक्ष होता,
कारण हात तुझा माझ्या हाती होता........

तुझ माझ्यावर असलेल्या प्रेमाची
मला जाणीव होत होती,
कारण हात तुझा माझ्या हाती होता..

संकलन -प्रविण मोरे

© " एक माझी रचना "