...

6 views

जाग लोकशासन तू
जाग लोकशासना तू
ऐसा कैसा निजलास रं ?
महीम चाले बेभान राजं
अजुनी कशात तू रंगलास रं?.....

उठाव लोकी नाट्य नव्याने
रोज नवी सहलीत रं ;
माफीनामा खोटी सजती
कधी यासानी का नडलास रं ?
जाग लोकशासना तू
ऐसा कैसा निजलास रं ?.......

रोज अपमानित होती संत महंत
राजा यांसनी कैसा दिसलास रं?
रोज नव्याने वाद उखलती
प्रश्न खरे तू काय विसरलास रं ?
जाग लोकशासना तू
ऐसा कैसा निजलास रं ?.......
@Sejal Saste
© All Rights Reserved