...

16 views

बदल तुझ्यातला
येता जाता पाहतेस मला,
आता काय दिसलं गं
माझ्यातलं तुला.

आधी तर नाक मुरडत होतीस,
मी दिसलो की तिरकी पाहत होतीस.

आता अचानक कसा काय बदल तुझ्यात,
खरंच सांग काय दिसलं माझ्यात..

बसला का माझ्यावर आता विश्वास,
हातात हात घेऊन टाकलास कसला निःश्वास..

@सचिन

© All Rights Reserved