...

8 views

चिमुकलीची विनंती
सांग ना ग आई मला कोण जपणार ...😭
तुझ्याविना जन्माला कोण घालणार ...
आईला पोटातील मुलगी म्हणते .
आई मला जन्म दे .
मला जग बघु दे .
नको मारू मला पोटात.
घेईन जन्म मी तुझ्या घरात.
सांग ना ग आई मला कोण जपणार....😭
तुझ्याविना जन्माला कोण घालणार ....
शाळेतून आल्यावर काम करणार .
बाबांकडे हट्ट मी ग नाही धरणार .
घेईन मी चांगले संस्कार.
वाईट नाही मी काम करणार.
बाबांची सगळी स्वप्ने पूर्ण करणार.
नाही ग मी दुख कोणालाच देणार.
सांग ना ग आई मला कोण जपणार ....😭
तुझ्याविना जन्माला कोण घालणार.....
लग्न झाल्यावर सासरी मी जाणार .
डोळे पुसायला तेव्हा तुझे कोन असणार.
चिमुकलीला पोटात मारून तुला काय ग भेटणार.
मुलिंसोबतच असे हे का ग होणार .
सांग ना ग आई मला कोण जपणार...😭
तुझ्याविना जन्माला कोण घालणार...
अभ्यासात पण मी खूप हुशार होणार.
नंतर खुप सुखी तुला मी ठेवणार.
कुणासोबत भांडण मी नाही करणार.
सगळ्यांशी मी छान बोलणार.
या चिमुकलीवर थोडी तर द्या कर ना ग आई.
मला पण या जगात आण ना ग आई .
सांग ना ग आई मला कोण जपणार...😭
तुझ्याविना जन्माला कोण घालणार...

मुलीला वाचवा मुलीला शिकवा ..

KOMAL GIRAM... 🖊️......