खरचं आपण आपल्या आई वडिलांसाठी एवढं ही नाही का करु शकत
आपल्याला चालायला ज्यांनी शिकवलं त्यांच्यासाठी
त्यांच्या म्हातारपणाची आपण काठी
बनू शकत नाही का.......?
आपल्याला बोलायला ज्यांनी शिकवलं त्यांच्यासोबत
आपण दोन गोड शब्द
बोलू शकत नाही का ..........?
ज्यांनी आपला आयुष्य घडवण्यासाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य घालवलं त्यांच्यासाठी आपण थोडा वेळ
काढू शकत नाही का........?
ज्यांनी आपल्याला कधीच उपाशी राहू दिलं नाही
ज्यांनी आपल्याला भूक लागली असताना खाऊ घातलं त्यांच्यासाठी त्यांना भूक लागल्यावर
दोन घास भरू शकत नाही का.......?
आपण जन्मल्यापासून ज्यांनी आपला सांभाळ केला
आपले लाड पुरवले त्यांना त्यांच्या म्हातारपणी
वृद्धाश्रमात न ठेवता आपण त्यांचा
सांभाळ...