...

1 views

महामानवास आदरांजली.
सुप्रभात समस्त स्नेही जनहो..!!

आज स्मरणपूर्वक अभिवादन भीमरायाला!!!!

स्वरचित आदरांजली:-

एप्रिल चौदा स्मृतीत माझ्या
अविस्मरणीय नोंदला आहे,
स्मरण माझ्या भीमाचे मज
अचूकपणे होणेच की आहे

असा वीरपुरुष क्वचित येतो
संघर्षाचा वस्तुपाठ दावितो
अवघ्या दलितजना उद्धरित
ज्ञानाचा प्रकाश खरा दावितो

नेक तयाने कार्य केले असे
समस्त जगत मानते असे
शिल्पकार घटनेचा तोच की
भारतदेशा ललामभूत असे

प्रणिपात तयाच्या कार्याला
प्रणिपात तयाच्या स्मृतीला
प्रणिपात तयाच्या कीर्तीला
प्रणिपात ह्या महामानवाला