...

2 views

मैत्री
मैत्री कधीही कुठेही आणि कोणासोबतही होते,
नाते मनाचे मनाशी जुळवूनी जाते.

अनोळखी अनोळखी म्हणता म्हणता आपलेसे होऊन जाते,
हाय हाय बाय बाय करता करता
सुख दुःखा मध्ये आधार देऊ जाते.

चुकीच्या वळणाला लागताच योग्य मार्ग दाखवते.
चेष्टा मस्करी करता करता आयुष्याचा धडा देऊन जाते.

मैत्री ही कळत नकळत जीवन जगायला शिकवते...