...

4 views

वर्तमानजीव k
नेत्रात भविष्याचे दिव्यास्वप्न
पाठीवर भूतकाळाची गाठोडी
वर्तमानात विसरत एकलास निघाला
जन्ममृत्यूने बंदिस्त वाटेवरती ..

भूतकाळाच भूत मस्तिक भेदे
भविष्याच्या स्वप्नांनी पापणी बसे
यात वर्तमानाची वास्तविकता पुसट दिसे
अश्या परिस्तिथी तो आनंद शोधे....

सुख- सुख म्ह्नत इकडे तिकडे भटकायचा
भूत - भविष्याच्या हेलकाव्यात वर्तमान विसरायचा
शोधून शोधून दमला,पाठीवरचा गाठोडं ठेवून
खाली बसला
पापण्यांना जरा विसावा दिला
वर्तमानाच्या वास्तविकतेत परत आला
तेवड्यात सुखाने ठोका दिला .....

M.Karishma