...

13 views

लहानपण
स्वप्नातील सुंदर गाव ,
'लहानपण' त्याचं नाव !
भातुकलीचा खोटा डाव ,
त्यात मनापासून होता भाव !!

भेद नव्हता, खेद नव्हता
खेळे आनंद मनमुराद !
तिथं भीती नव्हतीच कशाची
ती दुनियाच होती आझाद !!

विचारांचं स्वातंत्र्य ,
होतं त्या गावात !
कारण, माहितच नव्हतं
बाहेर चाललंय काय जगात !!

हळूहळू वय वाढलं
शाळा कॉलेजं मागं सोडली !
भातुकलीच्या डावाला
आता खरी सुरुवात झाली !!

सुख दुःखात, यशामागे
हे जग सारं मिरवलं !
आंधळ्या शर्यतीमध्ये
मात्र 'समाधान' तेवढं हरवलं !!

वर्षं सरली, वय सरलं
वेळ ही निघून गेली !!
अगदी आयुष्याच्या काठावर
पुन्हा, गावची आठवण आली !!

......." लहानपण "
_शशिकांत