...

9 views

बदनामी

सुंदरतेच्या अभावात
चूक नसते कोणाची
आकर्षणाने सुरुवात होते
प्रत्येक काळ्या प्रेमाची

प्रेमळ नाते निर्माण झाले
त्या अजाण वयात
ठराव नव्हता मानाला
त्या विकृत क्षणात

लागली सवय एकमेकांना
रोज रोज बघण्याची
प्रेमात पडलेत एकमेकांच्या
नव्हती गरज सांगण्याची

दोन विरुद्ध धर्माचा
वाईट होता इतिहास
जाणीव नव्हती त्यांना
की कसा असेल हा प्रवास

वाईट विचारांनी ती त्याला
कधीच नव्हती पारखत
बदनामीची भीती फक्त
त्यालाच होती जाणवत

अंधुक अश्या गैरसमजात
सोडली त्याने तिची साथ
त्या अकस्मात धक्क्याने
उडाला तिचा विश्वास

नैराश्याच्या काळोखात
ती हरवून गेली पूर्ण
बदनामीच्या ठप्प्याने ती
विसरून गेली जगणं

अंतीम निर्णय घेतला तिने
त्रासातून मुक्त होण्याचा
गुंत्यातून सुटून गेली
शेवट करून प्रेमाचा

अज्ञानात होता कवी त्याला
ज्ञात नव्हती व्यथा
आठवणींत रूतून कविने
कवितेत मांडली कथा

परिस्थितीच्या आधारावर
निर्णय नसतो बांधील
मनातील भाविक विवंचना
करते जगणे मुश्किल




© All Rights Reserved