...

38 views

उरले सूरले .... ...
उरले सूरले जपून वापरायची
सवय किती छान होती,
आयुष्य साधंच होतं तरी
मजा किती औरच होती!!

तोडकी मोडकी कंपास ,
पुन्हा जोडून वापरत होतो.
झिजली जरी पेन्सिल तरी,
टोपण लावून लिहीत होतो.

तुटलेला पेन पुन्हा पुन्हा
स्प्रिंग बदलून वापरत होतो.
एकच पेन खूप जपून,
रिफिल बदलून वापरत होतो.

जुनीच पुस्तके वर्तमानपत्राचे,
कव्हर लावून वापरत होतो.
तुझीच पुस्तके दे बरं मला,
आधीच सांगून ठेवत होतो.

जुन्या वह्यांची कोरी पाने,
दाभन वापरून शिवत होतो.
जुन्यातूनच नाविन्याचा,
आनंद...