...

1 views

नायक
गोर गरीबांचे केवारी तुम्ही
जनतेसाठी लढतात तुम्ही
आम्हा जनतेची माऊली तुम्ही
कधी धर्मासाठी तर कधी स्वातंत्र्यासाठी लढलात तुम्ही...

नित्य नियमाने कर्म तुम्ही करत गेले
कधीच नाही केला तुम्ही स्वतःचा विचार
सर्वांसाठी अंतकर्णतून लढलात तुम्ही
गोर गरबांचे दाता तुम्ही
आम्हा लेकरांचा स्वामी तुम्ही...

कधीच कोणाची साथ तुम्ही अर्धवट नाही सोडून गेलात
ज्यांना जायचं होतं
ते आधीच तुमची साथ सोडूनी गेले
तरीही तुम्ही खंबीरपणे उभेच राहिले...

स्वतःच्या जीवापाड देशाचे रक्षण तुम्ही केले
आजही इतिहासाच्या पानावर
सोनेरी शब्द लिखित आहेत
तुमच्या विचाराची यशो गाथा
आजही अमर आहे
आजही अमर आहे...