...

11 views

सिंबा 🦁
एक राजकुमार अचानक त्या दिवशी दिसला
फोटो पाहून त्याचा तो मना मध्ये बसला
रोज रोज त्याचीच स्वप्ने लागली पडू
कधी होईल भेट याची चाहूल लागली छळू
दिसायला सुंदर भलतीच त्याची ऐट
चाल त्याची भारदस्त सिंहा सारखी थेट
नाव गाव त्याचे काहीच ठाऊक नव्हते
मन त्याला भेटण्यास आतुर झाले होते
शेवटी कशी बशी ओळख काढली
भेटायला मला स्वारी सकाळीच घरन निघाली
वेळ पटकन जात नव्हती
आणि आतुरताही संपत नव्हती
शेवटी एकदाची हुरहूर संपली
दारात स्वारी येउन उभी राहिली
त्याला बघताच मन आले भरून
तोही अनोळखी असून गेला माझ्यात रमून
दुसरं तिसरं कोणी नाही हातर माझा पिल्लू
लाडाने आम्ही सारे बोलतो त्याला सींम्बू......