...

2 views

*रयतेचा राजा*
पापाचे घडे भरून मुघलांचे
केला त्यांनी रयतेचा छळ..
परमेश्वराला सहन न झाले
अंत त्यांचा आला जवळ...

१९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊच्या
पोटी जन्माला सोन्या सारखा लेक...
गड शिवनेरी आनंदला शिवविचार
त्याने समाज केला एक...


दादोजी कोंडदेव यांचा लाभला सहवास
घडविला शिवबा दाऊनी तलवारीचा पराक्रम...
जिजाऊने झाला शिवबा अभिमान
दाखवले सपान स्वराज्याचे करिती अनुक्रम...

घेतला त्या बाळाने
रायरेश्वराच्या मंदिरात प्रण...
दाविला शत्रूंना पराक्रम
केले स्वराज्य स्थापन...

दिले त्या जिजाऊने
मोलाचे संस्कार..
शिकवूनी गनिमीकावा
पेटवला रणी वीर झुंजार...

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी
जिकुनी तोरणागड मुघलांचा...
उभारले रयतेचे स्वराज्य
शोभला छावा त्या शहाजींचा...

शिव विचाराने जोडीले त्यांनी
मावळे विर झुंजार..
रणी दौडती वाऱ्यावानी
चालविला स्वराज्याचा कारभार...

कापूनी चार बोटे त्या शाहिस्ताखानाचे
घडविला थोर इतिहास..
चलवूनी कारभार स्वराज्याचा
रयतेच्या मुखी दिला स्वातंत्र्याचा घास..

फाडला आदिलशहाचा अजलखान
लावूनी हातात वाघनख..
थरारली आदिलशाही निजामशाही
दिले रयतेस आनंद नी सुख..

अशी कीर्ती तयाची अफाट
तीन्ही लोकी झेंडा स्वराज्याचा..
फडकवला भगवा रंग हातात
झाला अनंत हनुमंत राजा रयतेचा..

६ जून १६७४ रोजी जिजाऊच्या हस्ते
झाला राजाचा राज्याभिषेक..
झाला तो शिवबा छ्त्रपती स्वराज्याचा
करूनी रायेश्वराचा अभिषेक..

घडवली राजमुद्रा तया राजांची
जी जगजगी गाजते..
|| प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते...||

अर्थ तया सत्कर्मी मुद्रेचा
प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत जातो,
सारे विश्व तयाला वंदन करते,
तशीच शहाजीपुत्र शिवाजीराजांच्या
मुद्रेचा लौकिक वाढत जाते..

जणू हर्षाने फुलला रायगड
केला सप्त नद्यांच्या पाण्याने..
झाला अभिषेक शिवछत्रपतींचा
हरकून गेली रयत आनंदाने...

असा कित्येक केला
त्यांनी मोलाचा पराक्रम...
थरारले मुघसाम्राज्य
स्वराज्य रक्षणार्थ केले श्रम..


तरी वेड्यात अडकला पन्हाळगड
शिवाजीराजे होते त्या अंदर..
सिद्दी जौहर करी आक्रमण
राजांनी तरी आखली रणनीती सुंदर..

वेडा फोडूनी पन्हाळ गडाचा
राजे निघाले सुखरूप बाहेर..
दिली प्राणांची आहुती
दौडले वीर बाजीप्रभू झुंजार..

औरंगजेब भीतीने थरारला
पाहूनी पराक्रम राजांचा..
आग्राभेटीचा प्रस्ताव धाडला राजांना
निघाला छत्रपती स्वराज्याचा...

उधडला प्रस्ताव त्या बादशहाचा
त्याच्याच दरबारात..
कैद करूनी राजांना
बादशहाने केला घात..

देऊनी तुरी हातात बादशहाच्या
साधला चकवा गनिमीकावा...
आले सुखरूप रायगडी
शोभला जिजाऊच छावा...

वेळ जेव्हा आली
रयतेच्या सुखासाठी..
दोन वेळा लुटली सुरत
रयतेच्या कल्याणासाठी..

साडे तीनशे गड कोट
करूनी सामील स्वराज्यात..
वाढविली सीमा राज्याची
उतरून रणांगणात..

असा हा थोर पुरुष
घडविला गेला थोर शिल्पकार हाती..
उगवला सूर्य स्वातंत्र्याचा
रणी चमकवूनी तलवारीचे पाती..

मावळला सूर्य स्वातंत्र्याचा
चंद्र गेला अस्ताला..
३ एप्रिल १६८० रोजी
आले निर्वाण त्या राजाला..

असा हा छ्त्रपती थोर..
हा युगपुरुष होता थोर..
लावूनी तलवारी जोर जोर..
स्थापन केले स्वराज्य हे थोर थोर...

विनम्र श्रद्धांजली माझी
तया सत्कर्मी राजाला..
कोटी कोटी अभिवादन
दिले स्वराज्य स्वातंत्र्याला..

मानाचा त्रिवार मुजरा
तुला तुझ्या रयतेचा..
वंदितो कृपाळा तुम्हां शिवराया
तू प्रज्वलित सूर्य स्वातंत्र्याचा...

~ written by *दर्शन बोंबटकार*