...

7 views

rose day # valentine week #
मी गुलाब धरलं,
तिनं लाजत स्वीकारलं.
काट्याने रुतून बजावलं,
वास्तव मज प्रेमातलं.

तिच्या अश्रूंनी ओघळणं,
मंदपणे हळुवार फुंकरणं.
केसांच्या बटेनी रेंगाळणं,
माझ्या जखमेनी भरणं.

मी तीस मागितले,
स्थान हृदयाच्या कोपर्‍यातले.
तिच्या मिठीने उलगडले,
टाळे माझ्या काळजातले .

..... 📝 गेयता.
© All Rights Reserved