...

37 views

मला असच जगायला आवडत
मला हसायला आवडत,
मला बोलायला आवडत,
खूप विचार करणाऱ्या मला,
सगळ्यांना आनंद वाटायला आवडत....

उदास असेल मन,
तर एकांतात एकटच
बसायला आवडत...
रडावस वाटल,
तर चोरून चोरून रडायला आवडत...

आपला असो कि परका,
सार्यांचीच मदत करायला आवडत....
अन माझ्या वेगळ्याच
स्वप्नांच्या दुनियेत,
रोज मला रमायला आवडत...

पहिल्या पावसात
भिजायला आवडत...
लहान मुलांबरोबर खेळायला आवडत
मित्रांबरोबर फिरायला आवडत..

अन कोणीही काहीही बोलाल,
तर ती व्यक्ती अस का बोलली ?, ह्याचाच विचार करत
बसायला आवडत...

नाजूक फुला सारख लाजायला आवडत,
समुद्रांच्या लाटांना पाहायला आवडत...
फुललेल्या कळीला पाहून,
गालातल्या गालात हसायला आवडत...
अन वेड्यागत....
स्वतःच स्वतःशी बोलायला आवडत...
हो....

मी आहे Asach...
वेगळ|..
अन मला माझ आयुष,
असच वेगळ जगायला आवडत...