...

2 views

विचार करता
थोड विचार करता करता आठवलं...
लहानपणी अगदी (L.K.G )म्हणजेच Lower Kindergarten.पासून cursive letters शिकायची माझ्या मनात आवड निर्माण झाली होती. मला तेव्हा ते ही अवघड वाटत होते आणि हे त्या वयात साहजिकच होते. असं नाही की शाळेत ते अनिवार्य होते पण ती माझी आगळीच हौस होती जी मला काही ही करून मिळवायची होती पुरवायची होती.... अक्षर कधी कधी उलटे काढले जायचे,त्यांतील वळण कळायचं नाही तर कधी आकार छोटे मोठे! पण त्यावेळी माघार घेणे काय असते हे ठाऊक नव्हतं. रोज त्यावेळी मी सरावाचे संगीत गात होते. शेवटी पूर्ण एक महिन्यानंतर मोत्यासारखे ते cursive letters काढले गेले.... त्यावेळी नकळतपणे प्रयत्न आणि सराव याचे अर्थ उमगले.
हे माझ्याच बाबतीत नाही तर आपण सर्वच जण तेव्हा काही ही नवीन शिकायचे झाले तर आपण तहान भूक हरपून त्याला कसं ही आत्मसात करण्याची क्षमता ठेवत होतो आणि त्या गोष्टीने कंटाळत ही नव्हतो,
पण
आत्ताचं आयुष्य पाहता मला एक चित्र काढायचं झालं तर थोडीशी आकृती बरोबर नाही आली की ते चित्र अर्ध्यावरच बाजूला ठेवलं जातं आणि त्याला पूर्ण करायचा प्रयत्न ही बाजूलाच राहतं शिवाय त्याकडे पुन्हा पाहत ही नाही.
आपल्यात हे झालेलं अमुलाग्र बदल फार दुष्परिणामकारी ठरतं यांचं कारण म्हणजे प्रयत्न न करणे, सरावाची गरज वाटत नाही, सातत्याची कमतरता, काही नवीन शिकण्याची इच्छा नाही,मेहनत न करता सर्व काही मिळविण्यास इच्छुक, अएकआग्र मन, अशी बरीच कारणं, आणि म्हणूनच माणसाला कधी कधी जीवनाचं गणित सोडवताना येत नाही, जगा बरोबर राहून वेगळं व्यक्तित्व बनवता येत नाही, आणि निराशा नेहमी पाठीशी राहून आपल्याला तोंडावर पडण्यास भाग पडते.
© Vanshika Chaubey
© All Rights Reserved