...

1 views

बैलांची गत
शेतकऱ्याच्या संसारात
बैलाचाही मान
शेता मधी राबूनं..
हिरवं केलं रान..

धन्याच्या इस्टेटित
त्याचा मोलाचा वाटा..
वय झाल्यावर मात्र
धनी त्याचा काढतो काटा..

चुका काढून बैलाच्या
झुली खाली अंगार..
दलालाने लुटला
शेतकऱ्याचा संसार..

ट्रॅक्टर मशिन पाहुन
रडु लागला नंदी
धन्याच्या अंगावर
फुटु लागली मंदी..

रुपायाच्या मंदित
रुसून बसला नंदी..
चुकलेल्या धन्याची
तोच सोडवितो मंदी..

पिकांचा ही सुकला चेहरा
भोंड आली भेंडीला.
राहिली नाही किंमत
बैलाच्या ह्या जोडीला ...

ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला
तोलत नाही काटा.
रुपायाची बैलजोडी
करु लागली टाटा

शोरुममध्ये ट्रॅक्टर
घेतो आहे झोका.
बैल फिरत आहे मोकळी
त्यांच्या जीवाला आहे धोका..

बैलांची ही जोडी
रडू रडून नांदली.
कवाळ लिंबु मिरची
दारावावर बांधली

पुंगी वाजवी चाकर
पेरणीची झाली बोंब
धन्याला म्हणते बाबा
थोडा वेळ थांब

संत्री झाले मंत्री
धनी लागला रडु.
गोड गोड ट्रॅक्टर
आता कारल्यावाणी कडु

ट्रॅक्टर मागेफिरे
शेतकरयाचं गाऱ्हाणं
गोठ्या मधी आता
नुस्त राहिली तिफण

बैल पोळ्याच्या ह्या सणाला
बैल बसले रुसुन.
धन्याच्या चाकरीत रहायसाठी
त्यांचे डोळे आले आसून...

- दर्शन रामेश्वर बोंबटकार
© All Rights Reserved