...

20 views

expections...
कधी विचार केला आहे,
त्या माणसाचा,
ज्याच्यावर आपण प्रेमाच्या नावाखाली
नुसतं अपेक्षाचं ओझं लादत असतो,
त्याने माझ्यावर प्रेम ही करावं,
त्याने मला समजून ही घ्यावं,
त्याने मला सगळ्या प्रकारची security
दयावी,
त्याने माझी काळजी करावी,
त्याने मला nurture करावं,
त्याने माझ्या मित्राची,माझ्या वडिलांची, माझ्या आईची भूमिका साकारावी,
मी म्हणते का?
इथेच आपण चुकतो,
त्या एका माणसाकडून,
त्या एका नात्या कडूनच ,
सगळ्या गोष्टी पुर्ण करून घेण्याचा अट्टहास का?
कधी विचार केला आहे, त्याची किती घुसमट होत असावी,
ह्या सगळ्या expections च्या पर्वता खाली,
मग आपण justify पण करून मोकळे होतो,
ह्या तर बेसिक expectations आहेत,
ह्या छोट्या छोट्या च expectations च्या
जड ओझ्याखाली आपलं नात श्वास सोडत असतं,
आणि ह्याची जाणीव ही आपल्याला होत नसते..