...

7 views

नावडतीचं
नावडतीचं का असतं मीठच अळणी..
का संशयाची सुई आपण ठेवतो अंगवळणी...

म्हण खरंच ही रास्त आहे..
तरीही मनात राग, द्वेष, लोभ, अविश्वास जास्त आहे...

आवडतीचं सारं का गोड लागतं..
अनं सारं वागणं, वागवणं, बोलणं चांगलं, छान वाटतं...

अन्नाला कधी नावं ठेवू नये..
मनाला कुणाच्या कधी दुखावू नये...

नावडतीची जागा मनात कुणीही, काहीही घेईल..
तो, ती, भाषा, शिकणंसवरणं, कर्मधर्म, गावशहर,
राज्यपरराज्य, स्वराष्ट्र, स्वकीय.. आपलंही सारं नावडतं होईल...

चांगल्या विचारांची संगत जेव्हा मन सतत देईल..
आयुष्यात दु:खाची जागा सुख, समाधान घेईल...

जेवणात मीठ कधी कमी, जास्त होईल..
नावड बाजूला सारली तर..
आयुष्याची सर्वांच्या गोष्टच गोड होईल...

© Prasad Thale