...

16 views

ओल्या पावसाची सर
ओल्या पावसाची सर
बरसते संथ धार
थेंब थेंब अंगावर
झेलुयात प्रियकर

तुला सांगते सख्या रे
माझ्या मनातली बात
जसे ढग दाटलेले
निळाशार आकाशात

येते आठवण तुझी
अशा रंगी मौसमात
जेव्हा असे साथ तुझी
मजा येई भिजण्यात

गर्द काळे काळे मेघ
वीज कडाडे गगनात
तुझ्या मिठीत लपावे
घट्ट बांधुनीया हात

कधी येशील प्रिया रे
खूप पाहिलीय वाट
अंत पाहतोय माझा
आज उद्याचा हा घाट

जेव्हा येशी तू सोबती
नाही जाऊया माघारी
प्रेम करण्या तुझ्याशी
आवडे ही प्रीत न्यारी

© VIKRANT