...

2 views

परीक्षा ही आली.....
कोऱ्या कोऱ्या कागदावरी
चढली पेनाची नीली
र पोरा परीक्षा ही आली....

विद्यार्थ्यांचा संसरमांडी चौघडा बोलतो दारी
र पोरा परीक्षा ही आली....

सगळे, मित्रमैत्रिणी, जमतात कॉलेजच्या अंगणी
चढली जणू तोरणं मांडवदारी
किणकिना कागद हाती पेन्सिल पेन
सजली नटली परीक्षा ही आली....

कोऱ्या कोऱ्या कागदावरी
चढली पेनची नीली
र पोरा परीक्षा ही आली....

विद्यार्थ्यांचा संसारमांडी चौघडा बोलतो दारी
र पोरा परीक्षा ही आली.....

मुलामुलींची जणू परीक्षा ही मोठी
परीक्षा ही लावा विद्यार्थांच्या माथी
निळ्या पेनाने उत्तरपत्रिकेच अंग माखवा...
निळी करून तिला सासरी पाठवा...

मित्रमैत्रिणी जमतात कॉलेजच्या अंगणी
चढली जणू तोरणं मांडवदारी....

प्रश्नाच्या ओढीनं मुलं हासतात हळूच गाली
र पोरा परीक्षा ही आली...
विद्यार्थ्यांचा संसारमांडी चौघडा बोलतो दारी
र पोरा परीक्षा ही आली...

आला पेपर हाताला,हाताला र....
देव नारायण आला र ....
वर्गात गणगोत सारं बैसलं र ....
म्होरं जणू ढोलताशा वाजित मास्तर....

परीक्षेत मिळू दे तुला बुध्दीची काया
प्रश्नाच्या मायेसंग उत्तराची छाया
भरुनीया आलं डोळं जड जीव झाला
जड जीव झाला लेका पेपर काहीच न कळाला
जाय पेपरा संगी उत्तीर्ण आशेची पालवी
सजली नटली उत्तरपत्रिका झाली....
आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरीदारी
र पोरा सुखाच्या सरी.....

विद्यार्थ्यांचा संसारमांडी चौघडा बोलतो दारी
र पोरा परीक्षा ही आली....

Translate by दर्शन बोंबटकार