...

2 views

Manmade Things
गणपती मंडप जळवळच्या हॉस्पिटल मध्ये माझा जन्म झाला. शाळेचा दाखलेत हिंदू म्हणून नाव कोरलं गेलं. शाळेचा पहिला दिवस, माझा हाताला करकच्च धागा, आणि माझ्याच वयाच्या मुली ला बुरखा घालून शाळेत सोडल.लिहिताना ओला धागा पांढऱ्या कागदा वर आपले रंग सोडत जात होता. हाताला खाज होत होती, रुतत होता, काढण्याचा प्रयत्न केल्यावर कोणी म्हणायचं "बाऊ होईल ". कदाचित तिला ही कोणी तरी असच म्हणत असेल.
देवा कडे काही मागायचं असलं तर, तिला मस्जिद मध्ये आणि मला मंदिर मध्ये जावं लागे. "आपले गणपती बाप्पा, त्यांचे ताज्जूदिन बाबा", असं ऐकत ऐकत मोठा झालो. भीती मुळे त्यावेळीही माझा हाता वर धागा आणि तिचा अंगावर बुरखा होता. तिच्यातला माणूस झाकला होता, माझ्यातला माणूस बांधला होता. science चा पुस्तकात human असेलेला माणूसच आम्ही जन्म घेतल्या वर मेला होता.
पक्षी साठी आम्ही दोघे माणूस होतो,
झाडांसाठी आम्ही दोघे माणूस होतो,
गाई ढोरे यांसाठी आम्ही माणूस होतो,
दुसऱ्या ग्रहवर राहण्यारा alien साठी आम्ही दोघे माणूस होतो.
वाघा साठी आम्ही दोघे माणूस होतो,
कुत्रांसाठी आम्ही माणूस होतो,
पण ह्या "कुत्र्या" साठी आम्ही दोघे माणूस नव्हतो.
आज, तिला देवाघरी पाठवण्यासाठी कब्रिस्तान मध्ये नेत आहेत , आणि मला स्मशानभूमीत.
कदाचित आज ती बुरख्यातून आणि मी धाग्यातून कायमचे सुटू.