...

6 views

❤ रिमझिम पाऊस 🌧
😊😊😊

जणू ' चातकांची ' क्षमविण्यास सुधा ,
येतसे___ पर्जन्याचा ' ऋतू ' बहुधा !
पाझरता अनावर मेघ___ ' सावळे ' ,
तृप्त होतसे____ ' निळी ' वसुधा !

बळीराजाच्या ' आसक्त ' आसवांची ,
सरी... सरींतूनी उलगडते ___ व्यथा !
प्रेमीयुगुलांच्या ' अव्यक्त '__ प्रेमाची ,
' थेंब -थेंब '____ गुणगुणतो... गाथा !

रिमझिम पाऊस____ ' कवेत ' घेउनी ,
करितो नुसताच ' फुकाच्या ' बाता... !
कधी ' सततधार ' करी ___ सांत्वन... ,
परि असावी__ तयास ' मुक ' बाधा ... !

कधी गळतो __ कधी ' मनास ' छळतो ,
कधी भासतो___ तो ' खोटा---खोटा ' !
नसावे ... ' मना ' -- जणू पर्याय__ दूसरे ,
' अभ्यंग '___ पावसाविना अन्यथा... !

उडवीतो जरी__ ' शिंतोडे ' चिखलाचे ,
मना मनास ... भासतो__ तो ' साधा ' !
रिमझिम... रिमझिम... रिमझिम पाऊस ,
हवा हवासा ___ सदा... सर्वथा... !


✒️कवी ,
विजय दागमवार