...

6 views

civilian
एक आग लागली होती
त्या कथित व्यक्तित्वाने !!
कोण असेल तो ?
सिव्हिलियन असावा बहूतेक !
भांडत होता हक्कांसाठी
कोणाच्या आदेशाचं पालन करत ?
उभा होता पिंजर्‍यामध्ये स्वतःहून
सतत चालणाऱ्या प्रक्रियेत...
पाणीटंचाई
कचरा व्यवस्थापन
ईन्फ्रास्टक्चर
ग्लोबल वार्मिंग
असे अनेक प्रश्न घेऊन
पाठीवर उत्तराच्या तोंड शिवलेल्या बोचक्यासहीत....
सिव्हिलियन असावा बहूतेक!!
हो!
नक्कीच तो होता...


© Bkt...