...

1 views

काळया पाटीत पाटीत
काळ्या पाटीत पाटीत,
खडू चालते खडू चालते,
रेष अक्षरांची नाचते,
शिक्षक वाट दाखवतो, शिक्षक वाट दाखवतो
शिक्षक वाट दाखवतो...

शिक्षक साकारतो, विद्यार्थांच्या स्वप्नाला..
संग सरस्वती चाले, सुर स्वरांचा ओठाला..
दिवसा मागे दिवस जाती, लेकरे न्हातीधुती होती.. सरस्वतीच्या सहवासानं, भूल जिवाला पडती..
भूल जिवाला पडती,
आई वाट लेकराची पाहती
लेकरे आकलन करती,
आईवडील वाकुनी पाहती..
काळ्या पाटीत पाटीत....,
खडू चालते खडू चालते,
रेष अक्षरांची नाचते,
शिक्षक वाट दाखवतो, शिक्षक वाट दाखवतो
शिक्षक वाट दाखवतो...


झोकी झाडाला टांगून मायबाप राबराबून
लेकरास शिकायला शाळेत झाडती..
शाळेत झाडती...
पूजन करुन सरस्वतीचं हासती खेळती,
जनू भजन करिती स्वर व्यंजनांचा गजर..
सोनं चांदीवानी वाढेल मायबापाचा आदर...
जसा वाढेल आदर,
तसा फुलेल गजर....
काळ्या पाटीत पाटीत,
खडू चालते खडू चालते,
रेष अक्षरांची नाचते,
शिक्षक वाट दाखवतो, शिक्षक वाट दाखवतो
शिक्षक वाट दाखवतो......

ऊनपावसाला बांधून पाठीशी
सरस्वतीला प्रसन्न करतो..
विद्यार्थी शिक्षणाचं सपान पाहतो
विद्यार्थी सपान पाहतो,
रस पाहून शिक्षकांच्या सुद्धा,
मुखातून विद्या सांडते
मुखातून विद्या सांडते,
शिक्षणाचं सपान फुलते
काळ्या पाटीत पाटीत,
खडू चालते खडू चालते,
रेष अक्षरांची नाचते,
शिक्षक वाट दाखवतो, शिक्षक वाट दाखवतो
शिक्षक वाट दाखवतो....

जावं सपान भंगून एकदा उजाडेल भविष्य..
एका रात्रीतून होईल दरिद्री अदृश्य..
सर सरस्वतीची न्हाई कशी जानवली
विद्येने भरुन जाऊन लक्ष्मी उपजली..
मोती टपुरा आनंदाअश्रुंचा डोळ्यातून ओघळवा
तसा मायबापाचा लेकरांनी अभिमान वाढवावा
पाहून त्याचं मन आनंद वाढवावा
काळ्या पाटीत पाटीत,
खडू चालते खडू चालते,
रेष अक्षरांची नाचते,
शिक्षक वाट दाखवतो, शिक्षक वाट दाखवतो
शिक्षक वाट दाखवतो...

शिक्षकांचा ध्यास विद्यार्थी हृदयी झेलती..
शिक्षणाचा घास लेकरांच्या मुखी देती..
असं सरस्वतीचं देणं आकलन करुन फेडावं
तीर्थ बुद्धिमत्तेच देऊन तिचं पूजन करावं
कथा झिंझलेल्या आकलन शक्तीची पिढ्यापिढ्यात चालते..
पिढ्यापिढ्यात चालते, अमर ठरते
काळ्या पाटीत पाटीत,
खडू चालते खडू चालते,
रेष अक्षरांची नाचते,
शिक्षक वाट दाखवतो, शिक्षक वाट दाखवतो
शिक्षक वाट दाखवतो...

Written by दर्शन बोंबटकार
© All Rights Reserved