...

6 views

जीवनचक्र
होतो मी पाहिले गर्दीच्या घेऱ्यात
वेळ ही नव्हता स्वतःला जाणून घेण्यात
वाट पाहत होतो मी Saturday night ची आवर्जून
एकच होता तो दिवस sunday
वाटतं होत द्यावा वेळ स्वतःला
पण काय करणार साला
आपला दिवस असून आपला नसायचा
चालु होते हे असे विचित्र जीवनचक्र
त्यात आले कोरोनाचे संकटं

एकटा न येता घेऊन आला lockdown
lock करून सारे केले सगळे down
होतो आता मी निवांत घरी बसून
स्वतःला वेळ द्यायचा करीत होतो प्रयत्न
पण जातो थोडा वेळ कॉल आणि
social media वर बाकी
वेळ कसा चालला आहे
काहीच कळत नाही
पाहतो मागे वळून परत तर
होताच की माझा वेळ माझाच

फक्त जीवनचक्र च्या विचित्र घेऱ्यात अडून राहिलो
मुक्त राहण्याचा प्रयत्न कधी केलाच नाही