...

4 views

वाढणारी पगार चालतात, महागाई नाही...
वाढुनही न वाढणारी पगार आता हलकेच वाटु लागलेत...

शेतकऱ्यांचे अश्रु गाळून, महागाईवर दुःख आटु लागलेत...



प्रयत्न आणि चिंता माझ्यासाठीच माझ्या...

समाजासाठी फक्त शब्दांचे बाण माझ्या...



माझे अनुमोदन आणि सहभाग हा शब्दांनीच ठामपणे मांडेन....

पाठ वळल्यावरती मी माझ्या व्यथेवरती भांडेंन...



वाढणारी पगार चालतात, महागाई नाही...

खर्चानंतर शिल्लक हाती काहीं उरत नाही...



जमा खर्चाचा आकडा वाढतोच आहे...

अपेक्ष्यांच्या ओझ्यातुनही वेळ काढतोच आहे...



आयुष्य आता न संपणारी स्पर्धाच वाटू लागले...

मृत्यु शिवाय न थांबणारी प्रवाह-गर्ता वाटु लागले..



वाटतं थांबवेल मृत्यु आता पुढील प्रवास...

मृत्यु नंतरही शवात श्वास चालुच आहे...
© SURYAKANT_R.J.