...

6 views

काळ ठरवेल!
काळ ठरवेल किम्मत या खुळ्या भाव भावनांची,
काळ ठरवेल भविष्य या गुंतागुंतीच्या नात्याचं,
काळ ठरवेल काय योग्य आणि अयोग्य,
काळ ठरवेल काय पाप आणि पुण्य
मित्रा काळ सर्व काही ठरवेल!
पण कास प्रयत्नांची सोडू नकोस,
दिला शब्द मोडू नकोस,
प्रेम करायचे कधीच सोडू नकोस,
घेतला वसा टाकू नकोस,
माणुसकीला कधी विसरू नको
कारण सरतेशेवटी यश तेच श्रेष्ठ ज्यात यातना अनंत,
जीवन तेच सुंदर ज्यात आहेत कठोर परिश्रम, आणि जे जीवन देईल प्रेमाचा मूलमंत्र!

© Infinite Optimism