स्फुरला अभंग.....!
चंद्रभागा तिरी झाला,
अवघा एक रंग.....|
हरिनाम घेता मजला,
स्फुरला अभंग......||
भगवत वाणी ऐकण्याचा,
लागला हो छंद......
हरिनाम घेता मजला,
स्फुरला अभंग......||
संत सज्जनांचा घडिला,
जो परोपरी संग.....|
हरिनाम घेता मजला,
स्फुरला अभंग......||
भक्ती मार्गी बदलून गेले
माझे सारे अंतरंग.......|
हरिनाम घेता मजला,
स्फुरला अभंग......||
माऊलीचे चरणी भजनी,
झाले सारे दंग.......
हरिनाम घेता मजला,
स्फुरला अभंग......||
अमृतज्ञाना परी नव्हे तो,
दूजा कोणी गंध......
हरिनाम घेता मजला,
स्फुरला अभंग......||
नाम माझे ही असे नेमके
अर्थाचा विलक्षण ढंग
हरिनाम घेता मजला,
स्फुरला अभंग......||
ज्ञानेदेवे रचियेली ती,
मीच ज्ञानेश्वरी......|
पून्हा ठाकली करण्या सिद्ध
आज स्वतःला खरी......||
© PradnyaBhide
अवघा एक रंग.....|
हरिनाम घेता मजला,
स्फुरला अभंग......||
भगवत वाणी ऐकण्याचा,
लागला हो छंद......
हरिनाम घेता मजला,
स्फुरला अभंग......||
संत सज्जनांचा घडिला,
जो परोपरी संग.....|
हरिनाम घेता मजला,
स्फुरला अभंग......||
भक्ती मार्गी बदलून गेले
माझे सारे अंतरंग.......|
हरिनाम घेता मजला,
स्फुरला अभंग......||
माऊलीचे चरणी भजनी,
झाले सारे दंग.......
हरिनाम घेता मजला,
स्फुरला अभंग......||
अमृतज्ञाना परी नव्हे तो,
दूजा कोणी गंध......
हरिनाम घेता मजला,
स्फुरला अभंग......||
नाम माझे ही असे नेमके
अर्थाचा विलक्षण ढंग
हरिनाम घेता मजला,
स्फुरला अभंग......||
ज्ञानेदेवे रचियेली ती,
मीच ज्ञानेश्वरी......|
पून्हा ठाकली करण्या सिद्ध
आज स्वतःला खरी......||
© PradnyaBhide