...

4 views

मी पाहावे...
तु नटावे ...

मी पाहावे...

डोळ्यांनी माझ्या रूप साठवावे...



तु चालावे ...

मी पाहावे...

पावलांनी माझ्या मागे मागे यावे...



तु हसावे...

मी पाहावे...

मनाने माझ्या थोडे सुखवावे...



तू पाहावे ...

मी पाहावे...

न बोलताही काही बोलवावे...



तू लाजावे...

मी पाहावे...

इशाऱ्यातून तुला खुणवावे..



तू हसावे...

मी पाहावे...

हसून एकमेकांत गुंतून जावे...
© SURYAKANT_R.J.