...

16 views

🏞️निसर्ग🌺 पालक🌾शेतकरी...💫
🌿🌾 " शेतकरी राजा..."🌾 🌿

राजा राबतो मातीत, पिकवतो तो खुशीत...
लेकरांच्या भविष्याला,घडवितो तो रातींत !!

पहाटं-पहाटं तो जागूनी, उभा राहतो उन्हात...
पाखरांच्या सोबतीनं,गुरं वळतो रानात !!!
..................................................................
" दुष्काळात...🍃🍂🍁 "

पडे कोरडी जमीन,दिस उजाड-ओसाड...
हात जोडूनी आभाळा,पावसाची त्याला ओढ !!

आता सुकले रानं सारे, पाणी देईल का कोणी...
राजा उपाशीच झोपे,वाहे डोळ्यातून पाणी !!!
..................................................................
अशा वेळी शेतकरी राजास...✨🏞️
🔥🌊 " निसर्गाची साथ...💫⚡"

मानवाने मानवाच्या,जीवितेला दिला तडा...
वनराई नष्ट केली,पशू फोडे हंबरडा !!

काल फुलले शिवार,आज सुकले ते पार...
मानवा रे मानवा,नको बदलू संसार !!!
..................................................................
🌱🌳"निसर्गाची हाक"🌺🌴

मला जन्म पुन्हा दे ना, थोडीशी जागा मी घेईल...
आभाळाच्या संकटाला,उभा सोबत राहिल !!

तुझ्यासाठी जीव माझा,रडू नको रे लेकरा...
उभा राहतो खंबीर, शेतकरी तोच खरा !!
उभा राहतो खंबीर, शेतकरी तोच खरा !!!
..................................................................
अनमोल...
" हीच जन्मभूमि, हीच कर्मभूमी
मायभूमी सर्व लेकरांची... !!! "

💫🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💫

© Gautam