...

24 views

संस्कार
"संस्कार"

लहान मुले म्हणजे मातीचा गोळा
या गोळ्याला हवा तसा देता येतो आकार
म्हणून मुलांना योग्य वळण लावीत
बालमनावर रुजवावेत शिस्तीचे संस्कार

झोपून उठल्यावर स्वतःच्या
पांघरुणाची घडी घालायला शिकवावे
रोज सकाळ लवकर उठावे
प्रातःविधी ब्रश आंघोळ हे नियम पाळावे

सुरुवातीला त्यास कठीण जाईल
पण जमेल जस जसे ते मोठ होत जाईल
शाळेची तयारी त्यानेच करावी
तरच व्यवस्थितपणा त्याच्या अंगी येइल

स्वतःच स्वतः करावे असे वाटावे
म्हणून मुलांना शिकवावा स्वावलंबीपणा
प्रत्येक गोष्टीचे नीट वळण लावावे
बालपणापासूनच अंगी रुजेल नेटकेपणा

शाळेतून किंवा बाहेरून आल्यावर
चप्पल-बूट,दप्तर योग्य जागीच ठेवावे 
कपडे बदलून नीट घड्या घालून
तिन्हीसांज वेळी हातपाय स्वच्छ धुवावे

मुले मोठ्यांचे अनुकरण करतात
पशूपक्षावर प्रेम करावे हे व्हावेत संस्कार
आज्ञापालन, मोठ्यांचा आदर  करून
रोज सांज सकाळ देवाला करावा नमस्कार

संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी
शुभंकरोती रामरक्षा म्हणावी देवापुढे जाऊन
आदर्श नागरीक घडवविता येतात
लहान मुले मोठी होताना त्यांना शिस्त लावून

‘सत्यं शिवं सुंदरम्’ होइल तेव्हाच आपले घर
जेव्हा अवतरतील घडविलेले तारे जमीन पर
=====
© All Rights Reserved